Subscribe:

Labels

Nov 19, 2010

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस
न विसरता येणारा
प्राजक्ताच्या सड्यावर
जसं हलकंच दंव विसावणारं


लहानपणीचा पाऊस
खोट्या नाण्याचं आमिष देवून
त्याला धो धो बरसायला लावणं
फ़ेर धरून त्याच्याबरोबर
मलाच नाचायला लावणारा
आईचा धपाटा खाऊनही
पुन्हा खुणावणारा


पाऊस आता थोडा शहाणा झालेला
शाळेभोवती तळं करून
आम्हाला हक्काची सुट्टी देणारा..
दप्तर घरी टाकून
कागदाच्या नावेबरॊबर रमणारा…
एकमेकांवर पाणी उडवत मज्जा करणारा…


तोही एक पाऊसच होता
कॉलेजकट्ट्यावरचा…
टपरीवरची वाफ़ाळलेली चहा पीत
उगीच खाणाखुणा करण्याचा…
का कुणास ठाऊक हा पाऊस भिजवायचा
आम्हालाच आपली छत्री बंद करायला लावायचा

0 comments:

Post a Comment