Subscribe:

Labels

Showing posts with label Marathi Kavita - D. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita - D. Show all posts

Nov 20, 2010

देव्हार्यातील देव नि महान बाबा

देव्हार्यातील देवाची हकालपट्टी करून 
कुठला बाबा आणून ठेवलाय तुम्ही देव्हार्यात ?
टीव्हीवर रोज दिसतोय हा बाबा 
कसा धारदार नाकाचा ...
ह्याच्या नजरेचा चमक्तार 
खिळवून ठेवतो आख्या जमावाला 
आपल्या नजरेच्या टप्यात 
कसा फुले उधळतो हा  बाबा 
आणि जमाव गर्दी करतो फुलांचा प्रसाद लुटण्यास 
देव सोडून ह्यांना हा बाबा वाटतो महान 
गुंग होतात ह्याच्या भाषणात 
सर्वस्वाचे हे करतात दान. 
महान उपदेश करतो हा बाबा 
नि योगासनाचे जुनेच प्रयोग करतो 
जणूकाही हा ह्याचाच ब्रांड...!!
मी पण  गेलोय ह्याच्या सभेला 
[नि माझे  मीपण जात होते हरवून ]
माझेपण मन पण होत  होते बधीर 
कान सुन्न होत होते ...
नि मग मी पण होत होतो अवयवहीन 
नि मला जाणवले  
की माझ्या देव्हार्यातील देव मला दटावत होता 
माझ्या क्षणिक मोहाला ....!!
  
माझा देव कसा छान आहे ...!!
त्याच्याकडे  न मागता मला सगळे देतो आहे 
समईतील प्रकाश मला 
प्रसन्न करतो आहे 
मी नाही जात बुवाच्या सभेला 
मी नाही बघत त्याने उधळलेली फुले ... 
नि मुठीमुठीने जमावावर फेकलेला प्रसाद ..
मला नकोय त्याने दाखवलेली स्वर्गाची शिडी.
माझ्या मनात असतात अनेक विचार 
कारण मी घसरून पडेल शिडीवरून [!! ]
मला भीती वाटतेय 
नि ह्या विचाराने 
मी  सुन्न बेफाम ....!!


-- via Anonymous

Nov 19, 2010

दिवसा स्वप्ने बघतो मी..


अजब दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...
मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...
असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...
वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी..