Subscribe:

Labels

Nov 20, 2010

बाबा !!


खूप पावसाळे डोक्यावरून गेले 
मोजू नये ईतकी वर्ष उलटली 
परंतु तुम्ही माझ्या आठवणीत 
सतत असता 
हे शपत कुणाला सांगायला हवे का ??

माझी बायको मुले फक्त 
[ज्यांनी तुम्हाला कधी बघितले नाही]
तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात 
बघतात की , बघत नाही
कुणास ठाऊक ?
त्यांना  काय वाटते ? 
कुणास ठाऊक?
काय असतील त्यांच्या भावना ?
कुणास ठाऊक ??
मी सांगतो तुमच्या विषयी 
नि सगळे ऐकत   असतात 
मन लावल्या सारखे वाटते 
पण आतले डोळे बंद असतात 
बाह्य डोळ्यात कोठे नजर असते ?
कोठे हरवलेले असतात 
कुणास ठाऊक ?
श्राद्धाच्या दिवशी वडिलांचे नाव 
आजोबांचे नाव 
पणजोबांचे नाव घ्यावे लागते 
त्यावेळी माझ्या पण काय भावना असतात ??
कोण ब्वा हे पणजोबा ?
काय करत होते हे 
कुणास ठाऊक ???
शप्पत असे वाटते खरे !

तुमच्या विषयी  माझ्या काय भावना आहेत ?
तुमच्या आठवणीने खरेच आता डोळ्यात पाणी नाही येत 
पण शप्पत तुमची आठवण येत नाही येत 
असे नाही होत बाबा !!

तुम्ही कधी मुंबई टूरवरून 
जावून आला की ,
दिलीपकुमार किवा देवानंदच्या 
सिनिमाची कथा आम्ही स्टोभोवती  
कोंडाळे करून थंडीची जाणीव कमी करत 
जीवाचा कान करून ऐकत बसायचो 
हरवून जायचो 
तो काळ मला कसा आता अगदी 
छान दिसतोय ?
असे हे छान दिवस 
अगदी हाताशी असलेले वाटतात  
नि धरू गेले तर पार्यासारखे 
 कसे अलगद निसटून जातात बाबा??? 

किती काळ लोटला 
नि तुम्हीपण हरवून गेला बाबा 
आईसुद्धा !!
आम्हीसुद्धा होत्याचे नव्हतो झालो 
एका घरट्यामध्ये  गच्च मिठी मारून बसलेलो आम्ही 
पंखात बळ येताच घरट्याच्या शोधात उडून गेलो  
प्रत्येकाचे अलग अलग घरटे झाले आत्ता 

नि तुमचा फोटो जेह्वा आतल्या डोळ्याने बघतो 
तेह्वा जीव गलबलून येतो 
-- प्रतिभा

0 comments:

Post a Comment