Subscribe:

Labels

Showing posts with label Marathi Kavita - P. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita - P. Show all posts

Nov 19, 2010

पहिला पाऊस पडतो तेंव्हा..



पहिला पाऊस पडतो तेंव्हा

एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!


आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या

कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा


कानांमधे साठवुन घ्यायचे

गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ


पावसाबरोबर पाऊस बनून

नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं!


आपलं असलं वागणं बघुन

लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील


ज्यांना हसायचं त्यांना हसू दे

काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे


असल्या चिल्लर गोष्टींकडे

आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!


म्हणून…

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

प्रेम म्हणजे काय असतं ते

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! 
अजुन वेळ गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोज करतच नाही

-- मनोगत