हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही |
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही |
हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर |
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी |
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही |
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही |
हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली |
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही |
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड |
तितके काही गाल पसरणे अवघड नाही |
हसतो कारण दुसर्यानांही बरे वाटते |
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते |
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी |
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही |
हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे |
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे |
हसतो कारण सत्याची मज भिती नाही |
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.... |
Nov 17, 2010
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही - संदिप खरे
Tags:
Marathi Kavita - H,
Sandeep Khare
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment